संस्थापक (अभिजित घोरपडे)

 

अभिजित घोरपडे

(संस्थापक, भवताल मंच)

अनौपचारिक परिचय :

* साध्या-सोप्या शब्दांत लिहणारा, साध्या-सोप्या भाषेत बोलणारा आणि गुंतागुतींच्या-किचकट गोष्टींची समजेल अशी मांडणी करणारा लेखक, वक्ता (कम्युनिकेटर).

* पाणी-पर्यावरण हे विषय लोकांपर्यंत पोहोविण्यासाठी आणि त्यांना या विषयांमध्ये सामावून घेण्यासाठी बहुतांश ऊर्जा आणि पूर्ण वेळ देणारा कार्यकर्ता.

* पर्यावरण, भूगोल, परिसर हे विषय नाविन्यपूर्ण आणि रंजक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती.

* आगळावेगळा महाराष्ट्र जगापुढे मांडण्यासाठी विविध मार्गांनी (विविध प्रकारची डॉक्युमेंटेशन, व्हिडिओज्, आदी.) प्रयत्नशील असणारा माणूस.

औपचारिक परिचय :

पर्यावरण पत्रकार

मराठी पत्रकारितेत आणि महाराष्ट्राच्या पत्रकारितेत फारसे वाचायला न मिळणारे हवामान, पर्यावरण आणि शाश्वतता हे विषय केंद्रस्थानी आणण्यामध्ये महत्त्वाचा वाटा.

१. दै. लोकसत्ता

* १८ वर्षांची कारकीर्द. वरिष्ठ सहसंपादक या पदापर्यंत वाटचाल.

* भवताल पेज : पर्यावरणाला वाहिलेले साप्ताहिक / पाक्षिक पान सलग पाच वर्षे चालवले.

* रविवार पुरवणी: लोकरंग पुरवणीत सलग पाच वर्षे विविध विषयांवर स्तंभलेखन.

* मरणासन्न नद्या : महाराष्ट्राभर भटकंती करून नद्यांची सद्यस्थिती मांडणारी २५ भागांची मालिका.

* देशाच्या विविध भागात पर्यावरणीय समस्या पाहण्यासाठी दौरे

(महाराष्ट्रातील दुष्काळ, राजस्थानातील थरचे वाळवंट, गुजरात कच्छचे रण, बिहार कोसीचा पूर)

* कृत्रिम पावसाचा प्रयोग : महाराष्ट्रात २० सप्टेंबर २००३ रोजी कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाच्या विमानातील प्रत्यक्ष साक्षीदार.

२. भवताल मॅगझीन

* पर्यावरण, शाश्वतता या विषयांसाठी वाहिलेले आणि राज्याचा आवाका असलेले हे मॅगझीन : त्याचे संस्थापक आणि २०१५ पासून संपादक.

३. मुक्त पत्रकार कारकीर्द

* मुक्त पत्रकार या नात्याने विविध वृत्तपत्रांसाठी पाणी-पर्यावरण विषयांसाठी लेखन.

* अॅग्रोवन मध्ये अवतीभवती या नावाने पर्यावरणविषयक सदर; वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद.

* दै. सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, सामना, प्रभात या वृत्तपत्रांसाठी प्रासंगिक लेखन.

* ABP माझा वाहिनीवर मान्सून उलगडून दाखवणारी कलर्स ऑफ मान्सून मालिका.

४. पर्यावरण प्रसारासाठी

* पर्यावरण व पाणी हे विषय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम.

* व्याख्याने, सादरीकरणे, भाषणे, स्थळभेटी याद्वारे महाराष्ट्रभर जागरूकता.

शिक्षण :

१. बीएस्सी (भूशास्त्र / Geology)

२. पत्रकारिता पदवी

३. देश-विदेशातील विविध कार्यशाळांमध्ये सहभाग...

- हवामानबदल आणि मानवी विकास (नवी दिल्ली, २००७)

- कन्फ्लिक्ट्स इन हिमालयन वॉटर विषयावरील कार्यशाळा (सिंगापूर, २०१०)

- वॉटर अँड एनर्जी नेक्सस विषयावरील कार्यशाळा (टोकियो, २०१४)

- इंडियन रिव्हर नेटवर्कच्या “रिव्हर डायलॉग”मध्ये सहभाग, (कोडायकॅनॉल, ऑगस्ट २०१८)

- याशिवाय राज्य व देश पातळीवरील विविध कार्यशाळा व परिषदांमध्ये सहभाग

प्रकाशित पुस्तके :

१. लहरी हवा... कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

(आपल्या सभोवताली अनुभवायला मिळणाऱ्या हवामानाचे विविध घटक / संकल्पनांचा सर्वंकष आढावा. त्यामागचे विज्ञान, त्यांचा आपल्यावर-निसर्गावर पडणारा प्रभाव तसेच, या घटकांमधील रंजकता यांची साध्या-सोप्या भाषेत मांडणी.)

२. ग्लोबल वॉर्मिंग... राजहंस प्रकाशन, पुणे

(ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या ज्वलंत विषयांच्या बहुतांश मुद्द्यांची मांडणी करणारे मराठीतील पहिलेच पुस्तक.)

 ३. गाथा पर्यावरणाची... राजहंस प्रकाशन, पुणे

(पर्यावरणाच्या शंभर संकल्पनांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण)

४. संथ वाहते... रोहन प्रकाशन, पुणे

(महाराष्ट्रातील नद्यांच्या पात्रात प्रत्यक्ष फिरून त्यांची सद्यस्थिती मांडणारे पुस्तक. नद्यांना आणि अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण राज्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे विस्तृत चित्रण.)

५. पाणी ते पाणी... राजहंस प्रकाशन, पुणे

(पाण्याची खरी ओळख करून देणारे पुस्तक. पाण्याच्या विविध पैलूंची मांडणी.)

निवडक पुरस्कार :

१. पत्रकारितेसाठी देशातील प्रतिष्ठेचा रामनाथ गोएंका अॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जरनॅलिझम (मरणासन्न नद्या या लेखमालेसाठी, २०१०)

२. राज्य सरकारचा वाङ्मयीन पुरस्कार (ग्लोबल वॉर्मिंग आणि संथ वाहते... या पुस्तकांसाठी, २०१० व २०१३)

३. हवा पाणी आणि अभि या ब्लॉगला एबीपी माझाच्या ब्लॉग माझा-२०१५ स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक (२०१६)

४. पर्यावरणीय लेखनासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार (२०१७)

५. याशिवाय पत्रकारिता, लेखन आणि पर्यावरणातील कार्यासाठी विविध दर्जेदार संस्थांचे २५ हून अधिक पुरस्कार.

इतर दखलपात्र :

१. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये 'हवामानबदल आणि महाराष्ट्र' या विषयावर व्याख्यान (२१ मार्च २०१८).

२. बालभारती भूगोल समिती :

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या (बालभारती) भूगोल समितीवर २०१० ते २०१५ या काळासाठी कार्यरत.

३. जलसाक्षरता केंद्र :

महाराष्ट्र राज्याच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जलसाक्षरता केंद्र या महत्त्वाच्या उपक्रमात 'तज्ञ सदस्य' म्हणून सहभाग.

४. नागपूर येथील सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (ऑक्टोबर २०१८)