या पावसाळ्यात तुम्हाला काहीतरी भन्नाट उपक्रम करायचाय का?... आनंद देणारा, ज्ञान देणारा, शिवाय उपयोगी पडणारा! तर मग तुम्ही ‘भवताल’च्या ‘भिजूया आणि मोजूया’ (वर्ष ०३) या उपक्रमात सहभागी होऊ शकता. या उपक्रमात आपण महाराष्ट्राच्या सर्व भागातील सहभागी मिळून येत्या पावसाळ्यात दररोज पाऊस मोजणार आहोत. त्याच्या नोंदी सर्वांसाठी जाहीर करणार आहोत. त्याचबरोबर पावसाळ्याच्या अनुषंगाने आसपासचे वातावरण, सृष्टी, विविध जीव यांची निरीक्षणेसुद्धा नोंदवणार आहोत. हा एक प्रकारचा ‘समुदायाचा विज्ञान उपक्रम’ अर्थात ‘कम्युनिटी सायन्स इनिशिएटीव्ह’ असेल.
‘भवताल’च्या या उपक्रमाची सुरुवात गेल्या वर्षी, २०२१ च्या पावसाळ्यात झाली. त्यात महाराष्ट्राच्या सर्व भागातून तब्बल २७७ जणांनी पाऊस मोजला. त्याचबरोबर ढग, वारा, पावसाचे प्रकार, बुरशी, फुले, अळ्या-सुरवंट, कीटक, फुलपाखरे, पक्षी अशा नैसर्गिक घटकांची निरीक्षणेसुद्धा नोंदवली. हे सारे ‘भवताल’च्या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येत होते. या सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली. या वर्षी आपल्या हाताशी उत्तम वेबसाईट आहे. त्यामुळे आपल्या नोंदी, निरीक्षणे खूप चांगल्याप्रकारे लोकांपुढे मांडता येतील... तर मग तुम्ही सहभागी होणार ना?



सहभागी व्हा