दगडांच्या देशा

‘महाराष्ट्र घडवणारा खडक उलगडून दाखवणारा सर्टिफिकेट कोर्स
     
ज्याने महाराष्ट्र घडवला असा खडक समजला नाही, तर महाराष्ट्र कसा समजेल?... म्हणूनच भवतालने एका भन्नाट सर्टिफिकेट कोर्स आखला. आणि त्याच्या माध्यमातून आपला दगड समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. या कोर्सचे नाव, दगडांच्या देशा अर्थात ‘Basalt, the rock that carved Maharashtra’! खडकाचे विविध पैलू उलगडून दाखवणारा हा कोर्स. तो रंजक आहे, माहितीपूर्ण आहे आणि आपल्याच खडकाची नव्याने ओळख करून देणारासुद्धा. या खडकाने महाराष्ट्र कसा घडवलाय, हेही त्यातून समजते.
हा १२ रविवारचा कोर्स. ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान नियोजित होता. काही सेशन्स ऑनलाईन आणि महिनयातून एक सेशन प्रत्यक्ष फिल्डवर. विविध गावच्या लोकांना सहभागी होता यावे म्हणून ही रचना. या विषयातील तज्ञ मार्गदर्शन म्हणून पुढील व्यक्तिंचा सहभाग होता,
 
  • डॉ. विद्याधर बोरकर         (प्रसिद्ध पुराजीववैज्ञानिक / पॅलिएन्टॉलॉजिस्ट)
  • डॉ. हिमांशू कुलकर्णी      (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूजलतज्ज्ञ, अॅक्वाडॅम)
  • डॉ. तनुजा मराठे              (माजी भूशास्त्र विभाग प्रमुख, फर्ग्युसन कॉलेज)
  • श्री. अभिजित घोरपडे      (संपादक, भवताल / पर्यावरण अभ्यासक)
भवतालचा हा पहिलाच कोर्स. त्यामुळे प्रतिसाद कसा असेल, याचा काहीच अंदाज नव्हता. १५ - २० आले तर ठीक, असं वाटत होतं, पण त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ४० जणांनी प्रवेश घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उस्मानाबाद, सातारा,  अकोला, अहमदनगर असे राज्याच्या विविध भागातून आणि बंगळुरू, नेल्लोर असे महाराष्ट्राबाहेरूनही! सहभागींनी कोर्समधील प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून समजून घेतली, त्याचा आनंद घेतला. फिल्ड व्हिजिट्सनी तर सर्वांना या विषयाशी घट्ट जोडून घेतलं. प्रत्येकालाच खडकाची नव्याने ओळख झाली आणि भूविज्ञानाशी नातेही निर्माण झाले. त्यामुळे निसर्गात फिरताना समजून घेण्याचा, अनुभवण्याचा नवा पैलू सापडला.त्यातून पुढे लहान-मोठे प्रयोग, प्रकल्पही उभे राहिले... सांगा, आणखी काय हवे?
 
कोर्सची ठळक वैशिष्ट्ये अशी होती:
  • . कोटी वर्षांपूर्वीच्या बेसॉल्ट खडकाची ओळख
  • डोंगर-दऱ्यांमध्ये आढळणाऱ्या भूरचनांचा रहस्यभेद
  • खडकातील जगप्रसिद्ध खजिना हाताळण्याचा आनंद
  • खडकातील दुर्मिळ जीवाश्म समजून घेण्याची संधी
  • खडकात दडलेल्या भूजलाच्या गुपितांचा उलगडा
  • खडकाच्या प्रेमात पाडणारी  टूर, फ्लर्टिंग वुईथ रॉक्स !’ 
  • तीन महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स, दर रविवारी सेशन्स
  • भूविज्ञान (जिऑलॉजी) विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
  • प्रत्येकी ७५ मिनिटांची = १८ थिएरी सेशन्स
  • प्रॅक्टिकल, संग्रहालय भेट, दिवसभराची फिल्ड टूर