Bhavatal EcoCamp
    @ भंडारदरा

    About Bhavatal EcoCamp :  

    (भवताल + निसर्गजागर)

    एक्साइटिंग नेचर कॅम्प
    @भंडारदरा
    मोबाईल - टीव्हीपासून दूर, निसर्गाचा निखळ आनंद...

    ४ - ७ मे २०२३ (तीन मुक्काम - चार दिवस)
    (१० वर्षांवरील मुले-मुली / ३० सहभागी)

    मार्गदर्शन:

    • श्री. अभिजित घोरपडे (पर्यावरण व भूविज्ञान अभ्यासक)
    • डॉ. महेश गायकवाड (निसर्ग व वन्यजीव अभ्यासक)

    विशेष आकर्षण:

    • जलाशयाजवळ तंबूंमध्ये मुक्काम
    • ‘कळसुबाई शिखर’ वरील ट्रेक
    • जगप्रसिद्ध ‘सांधन व्हॅली’ ला भेट
    • रात्रीच्या वेळचा साहसी ‘जंगल ट्रेल’
    • भंडारदरा धरण-अमृतेश्वर मंदिराला भेट
    • वनस्पती, प्राणी, खडकांच्या गोष्टी
    • वटवाघूळ, मुंग्या, मधमाशांची रंजकता
    • सीडबॉल मेकिंग, रॉक-सीड्स कलेक्शन
    • आदिवासी सामूहिक नृत्याचा आनंद
    • निसर्गाशी जोडणारे अनेक उपक्रम

    शुल्क:
    पुण्यातून 'भवताल टीम' सोबत बसने येणारांसाठी =
    रु. ७,८०० / प्रति व्यक्ती

    भंडारदरा येथे स्वत: पोहोचणारांसाठी =
    रु. ६६०० / प्रति व्यक्ती


    (पुणे ते पुणे; सर्व समावेशक)



    Contact Details:  
      9545350862
      [email protected]

       Register


    (धोरण व नियम)

    ‘भवताल’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या इको-टूरच्या माध्यमातून सहभागींना निसर्ग, परिसर, पाणी, जैवविविधता, भूविज्ञान, वारसा अशा विषयांची सखोल माहिती व अनुभव दिला जातो. त्याअंतर्गत काही गोष्टींची काळजी घेतली तर हा अनुभव अधिक संपन्न करणारा असेल आणि निसर्गातील घटकांना हानी पोहोचवता त्यांचे संवर्धन करणारा ठरेल. इको-टूर दरम्यान पुढील गोष्टींची काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत =


    सर्व सहभागींनी ‘भवताल इकोटूर’ किंवा ‘भवताल इकोकॅम्प’ दरम्यान,

    पूर्वकाळजी :
    १) सहभागींनी आपापले ओळखपत्र सोबत बाळगावे आणि आयोजकांच्या विनंतीनुसार ते दाखवावे.
    २) सहभागींनी वैयक्तिक औषधे, पाण्याची बाटली, बॅटरी तसेच, त्या त्या हंगामानुसार उन्हासाठी टोपी, उबदार कपडे, छत्री-रेनकोट, आदी आवश्यक गोष्टी सोबत बाळगाव्यात.
    ३) प्रकृतीच्या गंभीर तक्रारी, अॅलर्जी किंवा तशा तक्रारी असल्यास त्याबाबत ‘भवताल’ टीमला पूर्वकल्पना द्यावी.

    शिस्त :
    ४) आपला प्रवास, ठिकाणांच्या भेटी व मुक्काम यादरम्यान सोबत असलेल्या ‘भवताल’ प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करावे.
    ५) इको-टूर किंवा इको-कॅम्पमध्ये विविध कारणांमुळे नियोजनात काही बदल संभवतात. अशा वेळी ‘भवताल’ प्रतिनिधींना पूर्ण सहकार्य करावे. नियोजनात / कार्यक्रमात अडथळे येतील असे वर्तन करू नये.
    ६) आपला प्रवास, ठिकाणांच्या भेटी व मुक्काम यादरम्यान मद्यपान व मादक पदार्थांना परवानगी दिली जात नाही. आपल्याकडून त्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    निसर्गाची काळजी :
    ७) सहभागींनी दरम्यान शक्यतो बाहेरील बाटलीबंद पाणी विकत घेवू नये. अगदीच आवश्यकता भासल्यास पाणी घेतले, तर रिकामी बाटली निसर्गात टाकू नये. सोबत बाळगावी आणि तिची ठिकाणी ती जमा करावी. या संदर्भात हवे असल्यास आयोजक मार्गदर्शन करतील.
    ८) जास्त कचरा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, निर्माण झालेला कचरा, कोणत्याही वस्तू, आवरणे, कागद-प्लास्टिक निर्सगात टाकू नये. हे सर्व सोबत बाळगावे आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची काळजी घ्यावी. या संदर्भात हवे असल्यास आयोजक मार्गदर्शन करतील.
    ९) नैसगिक गोष्टींना, इतर सजीवांना अपाय होईल, इजा होईल अशी कोणतीही कृती करू नये.

    निसर्गाचा आनंद :
    १०) इको-टूरमध्ये आपण बहुतांश वेळ निर्सगाच्या सानिध्यात असतो. त्या त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून मिळणारी माहिती शांतपणे ऐकावी, समजून घ्यावी, प्रश्न योग्य पद्धतीने विचारावे. 
    ११) भवताल इकोटूर दरम्यान निसर्ग, पर्यावरण व अवतीभवतीच्या घटकांचा अनुभव उघड डोळ्यांनी व संवेदनशीलपणे घ्यावा. हा आस्वाद आपण घेत असतानाच त्यामुळे इतरांना व निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याचीही काळजी घ्यावी
    इतर :
    १२) भवताल इकोटूर साठी प्रवासाची व्यवस्था ही त्या त्या टूरनुसार ‘भवताल’तर्फे किंवा सहभागींकडून वैयक्तिक असू शकते. त्या संदर्भात टूरनुसार सूचित केले जाईल.

    * भवताल इको-टूर / इको-कॅम्प संबंधी अटी आणि नियमांमध्ये परिस्थितीनुसार / वेळोवेळी बदल करण्याचे सर्व अधिकार ‘भवताल’कडे राहतील.


    प्रवेश रद्द करण्याचे धोरण:

    • ‘इको-टूर’ किंवा ‘इको-कॅम्प’ मध्ये एखाद्या व्यक्तीला / गटाला प्रवेश नाकारण्याचा अधिकार किंवा घेतलेला प्रवेश रद्द करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील. अर्थात, काही संयुक्तिक कारण असेल तरच असे पाऊल उचलले जाईल.
    • ‘इको-टूर’ किंवा ‘इको-कॅम्प’ मध्ये आपण नाव नोंदवल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव सहभागी होता येणार नसेल तर पुढील गोष्टी पूर्ण कराव्यात=
    १) ‘भवताल टीम’ला अधिकृत ईमेलवर ([email protected]) किंवा अधिकृत क्रमांकावर (9545350862) किंवा संबंधित टूरसाठी कळवण्यात आलेल्या संपर्क क्रमांक किंवा ई-मेलवर स्पष्टपणे व लेखी स्वरूपात कळवावे.
    २) आपली लेखी सूचना भवताल टीमपर्यंत पोहोचली आहे याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून नियोजनात व्यत्यय येणार नाही, आयोजकांची व इतर सहभागींची गैरसोय होणार नाही. तसेच, व्यवस्थांवर ताणही पडणार नाही.

    शुक्लातील वजावट :
    आपण प्रवेश घेतल्यानंतर तो रद्द केल्यास इको-टूर / इको-कॅम्प साठी भरलेल्या पूर्ण शुल्कातून पुढील प्रमाणे रक्कम वजा केली जाईल. आपली लेखी सूचना ‘भवताल टीम’ला उपलब्ध झाल्यानंतर शुल्कातून पुढीलप्रमाणे रक्कम वजा केली जाईल :

    इको-कॅम्प सुरू होण्यापूर्वी,

    २१ दिवस आधी (१२ एप्रिलपर्यंत):        ३० टक्के

    ७ दिवस आधी (२६ एप्रिलपर्यंत):         ६० टक्के

    शेवटचे ७ दिवस (२७ एप्रिल ते ३ मे):     ८५ टक्के


    सूचना :
    •  या धोरणात टूर / कॅम्प यांच्या स्वरूपानुसार काही बदल होऊ शकतात.
    •  केंद्र, राज्य, जिल्हा, स्थानिक किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने महामारीमुळे किंवा कोणत्याही अचानक उद्भवलेल्या / आपत्कालिन परिस्थितीमुळे लादले गेलेले लॉकडाऊन / निर्बंध / अलगीकरणाची स्थिती अशा परिस्थितीत ‘कोणताही परतावा’ दिला जाणार नाही. किंवा तो किती द्यावा, याबाबतचा अधिकार आयोजकांकडे असेल.

    अधिक माहितीसाठी :
    9545350862 / 9922063621
    [email protected]