या पावसाळ्यात पाऊस मोजणार ना?

 

भिजूया आणि मोजूया - २०२२ साठी नावनोंदणी सुरू

 

भवताल’तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे येत्या पावसाळ्यातही संपूर्ण महाराष्ट्राभर सामूहिकरित्या पाऊस मोजला जाणार आहे. हा उपक्रम जून ते ऑक्टोबर या काळात केला जाईल. या काळात दररोज १५ - २० मिनिटे (शक्यतो सकाळच्या वेळी) द्यायची तयारी असेल तर तुम्हीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकता. १० वर्षांच्या पुढील कोणीही यात भाग घेऊ शकेल. लहान मुले पालकांच्या / शिक्षकांच्या मदतीने सहभागी होऊ शकतात.

घर, अंगण, बाग, शेत, सोसायटी, कॉलनी, शाळा, महाविद्यालये, संस्था, ऑफिसेस, शासकीय कार्यालये अशा कोणत्याही ठिकाणी पाऊस मोजला जाऊ शकतो. महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यांना ज्यांना पाऊस मोजण्याची इच्छा असेल त्यांनी नाव नोंदवावे.

पर्जन्यमापक तयार करण्याबाबत आणि ते वापरून पाऊस कसा मोजायचा याबाबत ‘भवताल’तर्फे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण - मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य असेल. नावनोंदणी २३ मे २०२२ पर्यंत सुरू राहील.

नाव नोंदवण्यासाठी पुढील लिंक क्लिक करून किंवा QR कोड स्कॅन करून माहिती भरा.

लिंक –

https://www.bhavatal.com/bhijuya-mojuya

 

QR कोड -

उपक्रमाबाबत सविस्तर माहिती :

 

  • उपक्रम काय?

पावसाळ्यात आपल्या परिसरातील पाऊस दररोज मोजणे.

 

  • पाऊस कशामध्ये मोजायचा? कसा मोजायचा?

पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक वापरले जाते. ते घरच्या घरी सहज तयार करता येते, त्यासाठी विशेष खर्च येत नाही.

पर्जन्यमापक कसे तयार करायचे आणि ते वापरून पाऊस कसा मोजायचा याबाबत ‘भवताल’तर्फे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल, मार्गदर्शन केले जाईल.

 

  • यामध्ये कोण सहभागी होऊ शकते?

पाऊस मोजण्याची इच्छा असलेली व पावसाळ्यात दररोज १५ ते २० मिनिटे देऊ शकेल अशी कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणीही स्वतंत्रपणे पाऊस मोजू शकतात. त्यापेक्षा लहान मुले पालकांच्या / शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम करू शकतात.

हा उपक्रम सध्या महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील छोटी वाडी-वस्ती ते महानगरे असे कुठलेही रहिवासी भाग घेऊ शकतात.

 

  • यापूर्वी असा उपक्रम झाला आहे का?

हो. ‘भवताल’तर्फे गेल्या पावसाळ्यात (२०२१) असा उपक्रम करण्यात आला. त्यात महाराष्ट्रभरातून २७७ जणांनी पाऊस मोजला. पावसाचे आकडे ‘भवताल’च्या फेसबुक पेजवरून दररोज प्रसिद्ध केले जात होते. यात भाग घेतलेल्या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

 

  • पाऊस का मोजायचा?
  • यामुळे आपल्या परिसरात पडणाऱ्या नेमक्या पावसाची माहिती मिळेल.
  • पाणी, निसर्ग, पर्यावरण याबाबत निरीक्षण करता येईल व आकलन वाढेल.
  • ही आकडेवारी वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोगात येऊ शकते.
  • यातून आपण एक चांगली, उपयुक्त कृती केल्याचा आनंद मिळेल.
  • विज्ञान व पर्यावरण साक्षर समाज निर्मितीमध्ये आपला खारीचा वाटा असेल.

 

  • पावसाच्या नोंदींचे आपण काय करणार?
  • पावसाच्या नोंदी दररोज ‘भवताल’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातील.
  • प्रत्यक्ष नोंदी, त्यांचे आलेख, विश्लेषण या गोष्टीसुद्धा दिल्या जातील.
  • पावसाच्या आकड्यांवरून काही अभ्यास करता येऊ शकतील.

 

  • पाऊस मोजण्याबरोबर आणखी काय करणार आहोत?
  • पावसाळ्यात निसर्ग, जीवसृष्टी यांची निरीक्षणे घेतली जातील.
  • हवामानासंबंधी जग, भारत येथील ठळक घडामोडी दिल्या जातील.


सहभागी व्हा