कलर्स ऑफ मान्सून, वुईथ भवताल !

(२८ ऑगस्ट २०२१)

"लॉकडाऊन संपलंय, बाहेर पडण्यासाठी काहीतरी वेगळं ऑर्गनाईझ करा..." अशी विचारणा भवतालचे अनेक वाचक, प्रेक्षकांकडून विचारणा होत आहे. पावसाचे दिवस होते, तर मग मान्सून अन् पावसाची एक्साईटमेंट, एक्सपिरियन्स आणि अॅडव्हेंचर... यासाठी धो-धो पावसाच्या ताम्हिणी खोऱ्यात एक धमाल इको-टूर आयोजित करण्यात आली. सहभागींनी जो काही धमाल अनुभव घेतला, त्यामुळे ते  भवताल शी कायमचेच जोडले गेले. नेमकी कशी घडती ही इको-टूर?...

या इको-टूरची काही आकर्षणं होती -

● सह्याद्रीतील पाऊस, प्रवाहांची मजा अनुभवणं
● मान्सूनची रहस्यं उलगडणं
● रानवाटांचा थ्रिलिंग ट्रेल करणं
● प्राचीन देवराईचे गूढ विश्व समजून घेणं
● पावसाळी जैवविविधतेची उधळण पाहणं
● धरणाच्या बॅकवॉटरचा परिचय करून घेणं
सोबत तज्ञ होते,

श्री. अभिजित घोरपडे

● मान्सून, हवामान, पर्यावरण या विषयांचे अभ्यासक व लेखक
● ABP Majha वर प्रदर्शित "कलर्स ऑफ मान्सून" सिरीजचे निर्माते

डॉ. सचिन पुणेकर

● वनस्पती व जैवविविधतेचे प्रसिद्ध अभ्यासक
● वनस्पतींच्या २० पेक्षा जास्त प्रजातींचा शोध लावणारे संशोधक  

अशी घडली इको-टूर :

● शनिवारचा दिवस. सकाळी सकाळी ढगाळ वातावरण. दोन तज्ञ, भवताल चे दोन तत्पर व्हॉलेंटीयर, सोळा उत्साही सहभागी आणि आरामदायी बस. पिरंगुट, मुळशी, ताम्हणीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
● गप्पा, हास्य - विनोद सुरू असतानाच भूगाव येथील कामत हॉटेलमध्ये बस पोहोचली. चहा - नाश्ता, ओळख झाली आणि खऱ्या अर्थाने एकजीनसी गट तयार झाला.
● पहिला टप्पा होता, मुळशी धरणाच्या जलाशयाचा. धरण, त्याचे स्थान, त्याची निर्मिती, तंत्रज्ञान, विस्थापन, पुनर्वसनाचे मुद्दे असा सर्वंकष आढावा घेण्यात आला. धरण म्हणजे केवळ एक भिंत नसते, तर ते कितीतरी मोठे विश्व असते. याची स्पष्ट कल्पना आली.

● पुढचा मुक्काम ताम्हिणी गावातील विंझाई देवी आणि तिथली गर्द देवराई. देवीचं दर्शन, छोट्याशा पायवाटेने देवराईकडं जाताना मार्गातली फुलं-वनस्पती, कोळी-कीटक, बुरशी अशी जैवविविधता न्याहाळता आली. या प्रत्येक जीवाचं निसर्गात असलेलं स्थान, महत्त्व यांची उकल करता आली.
● पुढं प्रत्यक्ष देवराईत प्रवेश केला, तेव्हा तिथली वेगळा अनुभव घेता आला. तिचा देव, तऱ्हतऱ्हेच्या वनस्पती, महाकाय वेली, सूर्यकिरणांना खाली उतरू न देणारी अशी दाट झाडी, झऱ्यांना-ओढ्यांना-नद्यांना जन्म देणारं ते ठिकाण, तिथले नियम, अलीकडं झालेले बदल असं हे अनोखं विश्व समजूनही घेता आलं.
● मग तिथल्या निर्मळ प्रवाहाचा अनुभव, त्यातून मार्ग काढणं. मध्येच आलेली मोठी सर, इतकी मोठी की तिथं सर्वांनाच बेसावध गाठलं. मग त्या सरी अंगावर घेण्याचा आनंद... व्वा, कधीही न विसरता येण्याजोगा हा अनुभव! 
असं वातावरण की तिथून पायच निघत नव्हता. त्या वातावरणात गरमागरम कोऱ्या चहाने मजा आणली.
● पुढचा टप्पा म्हणजे ताम्हिणीची ती अप्रतिम घळ अर्थात प्लस व्हॅली. तिची निर्मिती, तिचा पावसाशी - तिथल्या भूरूपाशी असलेला संबंध. हे सारं समजन घेतल्यावर तिची नव्याने ओळख झाली. तिथल्या धबधब्यात मनसोक्त भिजणंही झालं.

● भूक लागली होती, जेवण वाट पाहत होतं. ठिकाण होतं, नितांतसुंदर अशी गरूड माची. गरमागरम, चविष्ट जेवण. शांतपणे बसून मान्सूनची ओळख करून घेणं आणि मग प्रत्यक्ष ट्रेल.

● शेवटचा टप्पा होता, सह्याद्रीचे माथे आणि कोकण यांची विभागणी करणारा घाट. तिथलं एक विस्तीर्ण पठार. आपण उंचावर असतो आणि खाली ६०० - ७०० मीटर खोलीवरचा क्षितिजापर्यंत पसरलेला कोकण. ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच होतं.
● माघारी निघताना एक गोष्ट खटकते. अतिशय सुंदर पठार, पण तिथं इतस्तत: पसरलेला कचरा- प्लास्टिक, बाटल्या, कागदी प्लेट्स, खाण्याचे पदार्थ. एकाने पुढाकार घेतला आणि मग वीसेक मिनिटांमध्ये संपूर्ण पठार चकाचक बनलं. ते पाहून इतर पर्यटकही साथ द्यायला आले.
● ज्ञान, अनुभव, आनंद आणि समाधान... यांची कमाई करत "कलर्स ऑफ मान्सून"ची इको-टूर साजरी झाली; पुन्हा पुढच्या टूरमध्ये सहभागी होण्याचा निश्चय करून.

#भवताल #भवतालटूर्स #मान्सून #मान्सूनमॅजिक #कलर्सऑफमान्सून #ताम्हिणी #पाऊस #देवराई #धबधबा #व्हॅली #प्रवाह #सह्याद्री # अॅडव्हेंचर #ट्रेल #वेस्टर्नघाट #जैवविविधता #ढग #Monsoon #MonsoonMagic #ColoursOfMonsoon #Tamhini #Rains #SacredGrove #WaterFall #Trail #Valley #Advanture #Stream #Biodiversity #WeaternGhats #Sahyadries #Bhavatal #BhavatalTours