लाईफ ऑन प्लॅटूज, वुईथ भवताल!

(२४ - २५ सप्टेंबर २०२१)

(कातळसडे, त्यावर फुलणारी जीवसृष्टी, देवराई यांचा अनुभव देणारी अनोखी टूर)

पावसाळा संपता संपता आपल्याकडचे सडे फुलतात, खुलतातसुद्धा! एरवी ओसाड वाटणारी ही पठारं अचानक जिवंत होतात. तिथं उत्सव भरतो हिरवाईचा, लहान-मोठ्या फुलांचा, त्यावर जमणाऱ्या कीटकांचा, फुलपाखरांचा आणि त्यांचा माग काढत येणाऱ्या पक्ष्यांचा... विशेष म्हणजे हे सारं नाट्य भव्य, मोहक अशा नेपथ्यावर सुरू असतं. ते असतं, जमिनीवर उतरलेल्या ढगांचं, अधूनमधून बरसणाऱ्या सरींचं आणि चोरपावलांनी येणाऱ्या प्रकाशाचं! असे कातळसडे, देवराई, धरण अनुभवण्यासाठी भवतालने सप्टेंबर महिन्यात हाक दिली, मग त्याला प्रतिसाद मिळासा नसता तरच नवल! या वेळचा परिसर होता- भिमाशंकरच्या मार्गावरचंआंबेगाव, डिंभे, आहुपे!

आकर्षण होतं

● कातळसड्यांवरील जीवसृष्टीची रहस्ये
● परंपरागत देवराई पाहणे - अनुभवणे
● डिंभे धरण प्रत्यक्ष पाहण्याची संधी
● जलाशयाच्या काठालगत मुक्काम
● आदिवासी परिसराची ओळख, अनुभव
● तज्ज्ञांसोबत निसर्गखजिन्याचा उलगडा

सोबत होते,

● रेवती गिंडी (कातळसडे, एथनो-बॉटनी अभ्यासक)
● अभिजित घोरपडे (भूविज्ञान, पर्यावरण अभ्यासक)
● तुषार पवार (वन्यजीव अभ्यासक)

इको-टूरमधला अनुभव:

● एकीकडे पाणी (जलाशय), दुसरीकडे डोंगरावरील झाडी आणि त्यांच्यामधून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास.
● जलाशयाच्या काठावरच नीरव शांतता असलेल्या ठिकाणी मुक्काम.
● डिंभे जलाशयात सुरक्षितपणे पाय सोडून मनसोक्त लाटा अनुभवणं.
● धरणाचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ओळख करून घेणं.
● परंपरागतरित्या जपलेल्या देवराईंची माहिती, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव.
● सड्यांवर फुललेल्या विविधरंगी, विविधढंगी फुलांची-वनस्पतींची ओळख.
● गुढग्यावर बसून इवल्याशा गवताचं, फुलांचं, कीटकांचं नातं समजून घेणं.
● देवराईत शिरताच नितांत सुंदर शेकरू ‘स्वागता’ला सामोरं येतं; त्याचं मनसोक्त दर्शन.
● कोवळ्या उन्हात न्हालेली, पठाभर पसरलेली पिवळीधमक सोनकी पाहणं.
● ढगांच्या दुलईत हरवून जाणं, पावसाच्या सरीत चिंब होणं.

image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master