दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन व्यापारी मार्गावर

(४ व ५ डिसेंबर २०२१)

महाराष्ट्राच्या सुवर्णयुगात नेणारी अफलातून टूर

सर्वसामान्य माणसाला अफलातून अनुभव देणारा उपक्रम म्हणजे भवताल टूर्स. या वेळी, सातवाहन राजवटीच्या कालखंडात म्हणजेच २००० वर्षांपूर्वीचा व्यापारी मार्ग अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. लोकांना त्या काळात डोकावायला मिळणार होते. तेव्हाच्या खाणाखुणा, धारणा, त्यांचा अर्थ, लोकजीवन, व्यापार या गोष्टी अनुभवायला मिळणार होत्या. शिवाय दोन हजार वर्षांपूर्वी माणूस ज्या मार्गाने व्यापारी करत होता, त्यावरून स्वत: प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार होता. या इक-टूरला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला.

ठळक वैशिष्ट्ये होती,

● प्राचीन महाराष्ट्राच्या सागरी प्रवेशद्वाराचे दर्शन.
● शूर्पारक (नालासोपारा) येथील बंदराच्या खाणाखुणा.
● २००० वर्षांतील समुद्रपातळी बदलाचा अनुभव.
● जलमार्ग, स्तूप, लेणी, वस्तू, आदी. वारशाचे दर्शन.
● ऐतिहासिक नाणेघाट पायी चढून जाण्याचा ट्रेल.
● कल्याण, टिटवाळा, जुन्नर नगरींतील अवशेष.

सोबत तज्ज्ञ-मार्गदर्शक होते,

● डॉ. अभिजित दांडेकर (पुरातत्त्व शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज)
● अभिजित घोरपडे (भूविज्ञान अभ्यासक)
● जोडीला त्या त्या ठिकाणचे स्थानिक अभ्यासकही होते.

एक धमाल टूर:

● या इको-टूरमधील सहभागी पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, गोवा असे विविध ठिकणाहून आले होते. त्यात विद्यार्थी, शिक्षक, आर्किटेक्ट, इतिहासाचे अभ्यासक, आयटी व्यावसायिक, निवृत्त झालेली सक्रिय मंडळीसुद्धा होती.
● नालासोपारा अर्थात शूर्पारक येथील प्राचीन बंदर तसेच, त्या काळातील बौद्ध स्तूप पाहता आला. तिथे सापडणाऱ्या त्या काळातील वस्तू, जुने अवशेष यांची माहिती घेता आली.
● पूर्वी वापरात असलेले आणि आता बदललेले जलमार्ग, त्या काळातील मूर्ती, त्यांच्या घडवण्यात झालेले बदल, विविध कालखंडात लोकांच्या बदलत गेलेल्या धारणा अशा अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहून समजून घेता आल्या.
● प्राचीन व्यापारी मार्गावरील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे लेणी. भिवंडीजवळ लोनाड येथे असलेली तत्कालीन लेणी पाहणे आणि तिचे त्या काळातील महत्त्व समजावून घेणे हा प्रत्यक्ष त्या काळात नेणारा अनुभव होता. या वास्तूमध्ये झालेले बदल समजून घेताना काळानुसार स्थित्यंतरे कशी येत गेली, राजकीय - धार्मिक परिस्थिती तसेच, समाजाच्या धारणा कशा बदलत गेल्या याचे आकलन झाले.
● टिटवाळा येथे उल्हास नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण. तिथेही प्राचीन व्यापारी मागाचे अनेक पुरावे मिळतात, प्राचीन व्यापाराच्या निमित्ताने असलेल्या नोंदींमध्ये या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. तिथे गेल्या २००० वर्षांच्या कालखंडात सापडलेल्या वस्तूंचा समृद्ध असा संग्रह पाहता आला. त्याद्वारे उल्हास खोरे वेगवेगळ्या कालखंडात कसे बदलत गेले, याचा अंदाज आला.
● मुरबाड येथील सुंदरशा फार्महाऊसवरील रात्रीचे जेवण, त्यानंतरच्या गप्पा आणि मुक्काम कधीही विसरण्याजोगा नव्हता. हा संपूर्ण भाग सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरपर्यंत धुक्यामध्ये गढून गेला होता. हे धुकं, झाडाची पानं-गवताची पाती अशा प्रत्येक वस्तूवर साचलेले दवबिंदू यामुळे आदल्या दिवसाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
● दुसऱ्या दिवसाचे प्रमुख आकर्षण म्हणजे

image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master image_master