Articles 
या पावसाळ्यात भवताल सोबत  तुम्हीपण पाऊस मोजणार ना?

या पावसाळ्यात भवताल सोबत तुम्हीपण पाऊस मोजणार ना?

या पावसाळ्यात भवताल सोबत

तुम्हीपण पाऊस मोजणार ना?

- पुढील आठवड्यात नावनोंदणी सुरू

 

‘भवताल’च्या सामूहिकरित्या पाऊस मोजण्याच्या ‘भिजूया आणि मोजूया’ या उपक्रमाला गेल्या वर्षी लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महाराष्ट्रभरातील तब्बल २७७ जणांनी पाऊस मोजला. येत्या पावसाळ्यात हा उपक्रम आणखी व्यापक पद्धतीने राबवला जाणार आहे. त्याची जय्यद तयारी सुरू असून, पुढील आठवड्यापासून नावनोंदणी सुरू केली जाईल. या वर्षी पाऊस मोजण्यामध्ये किती जण सहभागी होतात याबाबत उत्सुकता आहे.

‘भवताल’तर्फे ‘समुदायाचा विज्ञान उपक्रम’ अर्थात ‘कम्युनिटी सायन्स इनिशिएटीव्ह’ म्हणून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याची सुरुवात गेल्या वर्षी पाऊस मोजण्याच्या उपक्रमाने झाली.

   

गेल्या वर्षाचा उपक्रम

  • उपक्रम १५ जून ते १५ ऑक्टोबर २०२१ या काळात म्हणजे १२२ दिवस चालला.
  • ‘भवताल’ टीमने लोकांना, पर्जन्यमापक बनवणे, प्रत्यक्ष पाऊस मोजणे, त्याच्या नोंदी पाठवणे याबाबत प्रशिक्षण दिले होते.
  • मुंबई-कोकणासह विदर्भापर्यंत आणि धुळे-जळगावपासून कोल्हापूरपर्यंत अशा प्रकारे राज्याच्या सर्वच भागातून २७७ जणांनी प्रत्यक्ष पाऊश मोजला.
  • त्यांनी पाऊस मोजण्यारोबरच ढग, वनस्पती, फुले, कीटक-अळ्या, फुलपाखरे, पक्षी यांची निरीक्षण घेतली.
  • या सर्वांना ऑनलाईन प्रमाणपत्रे देण्यात आली.


 

येत्या पावसाळ्याचे नियोजन

  • याची नावनोंदणी पुढील आठवड्यात सुरू होईल. त्याची घोषणा केली जाईल.
  • या क्षेत्रातील तज्ञांची ‘सल्लागार टीम’ या उपक्रमाला मार्गदर्शन करणार आहे.
  • ‘भवताल’च्या अद्ययावत वेबसाईटवर पाऊस मोजण्याबाबत मार्गदर्शन, पावसाच्या नोंदी, लोकांचे अनुभव, पाऊस-हवामानाच्या जगभरातील घटना याबाबत माहिती असेल.
  • सहभागींना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय राज्यभरात ९ ते १० ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रशिक्षण दिले जाईल व लोकांशी संवाद साधला जाईल.
  • सहभागी होणारे लोक पावसाबरोबरच परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी घेतील.
  • नोंदींचे विश्लेषण करून त्यांचा अभ्यास केला जाईल. पावसाच्या स्थितीबाबत विविध आलेख, नकाशे वेबसाईटवर उपलब्ध असतील.

त्यामुळेच, या वर्षी पाऊस मोजण्यामध्ये किती जण सहभागी होतात याबाबत उत्सुकता आहे. तुम्हीसुद्धा यामध्ये असणार ना?

भवताल वेबसाईटवर (bhavatal.com) लवकरच घोषणा केली जाईल.

       

18 Comments

SUMANT GAJANAN WAGHDARE

पाऊस मोजायला तयार आहे

Kedar Birajdar

Interested

Bhavatal Reply

ok

Milind Deuskar N.

I am having good open space above my house.

Rohit Sawant

I also want to participate

Sunita Rajendra wagh

Yesss👍

Girish Shivram Shintre

I would like to participate

Hemraj Punamchand Patil

I want to participate and contribute for Bhavatal Teams Work.

Deepali Rajendra Kadam

Yes, I want to participate

Urmila shantaram kharat

I would like to participate

Timir Kambli

नक्की येणार

Salve Akshay sanjay

Yes am ready

Salve Akshay sanjay

Yes am ready

ABHIRAJ KAILAS WAKCHAURE

Yary nice

Sonule Gayatri Santosh

Yess

Pravin Paigude

पाऊस मोजायला तयार आहे

Yes

Yes

I wish to participate

Bhavatal Reply

OK, plz register your name on link given in the website.

Your Comment

Required fields are marked *

You may also like