Articles 
मान्सून केरळात २७ मे रोजी दाखल होणार!

मान्सून केरळात २७ मे रोजी दाखल होणार!

मान्सून केरळात २७ मे रोजी दाखल होणार!

- वेळेआधी येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

सामान्यत: १ जूनच्या आसपास केरळच्या किनाऱ्यावर दाखल होणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) या वर्षी सरासरी वेळेआधी दाखल होणार आहे. या वेळी तो २७ मे म्हणजेच सरासरीच्या पाच दिवस आधी दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे.

हवामान विभागाकडून मानसूनच्या काळात पडणाऱ्या पावसाचा अंदाज दिला जातो. त्याचबरोबर २००५ सालापासून मान्सूनचे आगमन कधी होईल याबाबत असा अंदाज देणे सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून हा अंदाज दिला जातो. ज्या मॉडेलनुसार हे अंदाज दिले जातात, त्यात चार दिवसांची तृटी अंतर्भूत आहे. त्यामुळे तो दिलेल्या तारखेच्या चार दिवस आधी किंवा नंतर या मर्यादेत येऊ शकतो, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, मान्सून १५ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात पोहचेल, असाही अंदाज देण्यात आला आहे. 

मान्सून यापूर्वी केरळात दाखल झालेल्या तारखा पुढीलप्रमाणे:                            

वर्ष तारीख
२०२१ ३ जून
२०२०  १ जून
२०१९  ८ जून
२०१८  २९ मे
२०१७ ३० मे
२०१६ ८ जून
२०१५  ५ जून
२०१४   ६ जून
२०१३   १ जून
२०१२ ५ जून
२०११  २९ मे
२०१०  ३१ मे
२००९ २३ मे
२००८ ३१ मे
२००७  २८ मे
२००६ २६ मे
२००५ 

७ जून

 

1 Comments

खूपच छान उपक्रम आणि लेख आहेत.

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like