Articles 
शेत नांगरताना असं काही सापडलंय??

शेत नांगरताना असं काही सापडलंय??

इतिहास आणि संस्कृती उलगडणारे पुरातत्वशास्त्र

कल्पना करा, शेत नांगरत असताना एक महत्त्वाचा पुरातत्वीय पुरावा सापडतो आणि त्याच्यावरून आपल्या इतिहासाबद्दल भन्नाट काहीतरी उघडकीस येतं...? ही कल्पनाच कमालीची रोमांचित करणारी आहे... तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण खरंच असं प्रत्यक्षात घडलंय, एकदा नव्हे तर अनेकदा! आतापुरतं एक उदाहरण महाराष्ट्रातलं, तर एक महाराष्ट्राच्या बाहेरचं!

उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात मांडी नावाचे गाव आहे. ती एक महत्त्वाची पुरातत्वीय साईट. अपघाताने उघडकीस आली. तिथे शेत नांगरलं जात असताना शेतकऱ्यांना सुमारे १० किलो वजनाची सोन्याची नाणी व दागिने मिळतात. त्याचा बोभाटा व्हायचा आत त्यातले बरेचसं सोने वितळवलं जाते. मात्र, ही माहिती पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचते. त्यावर लगेचच कार्यवाही होते आणि सोन्याचा उरलेला साठा जप्त केला जातो.

त्याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येथे की हे सर्व सोन्याचे दागिने हरप्पन / सिंधू संस्कृतीच्या उत्तर कालखंडातील आहेत. (काही अभ्यासाकांचं आधी असं मत होतं की हा सोन्याचा साठा कुषाण काळातील असावा.) विशेष म्हणजे आतापर्यंत हरप्पन संस्कृतीच्या कालखंडात सोन्याचे जे काही दागिने मिळाले आहेत, त्यातला हा सर्वात मोठा साठा असल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना गेल्या काही दशकातली. सोन्याच्या संदर्भातली ही खूपच महत्त्वाची निष्पत्ती. यापूर्वी सुद्धा हरप्पन संस्कृतीच्या ठिकाणांवरून सोनं मिळालं होत, पण अतिशय अल्प प्रमाणात. मात्र इथल्या सोन्यामुळे या संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

दुसरी गोष्ट १९९० च्या थोडीशी आधीची. नागपूरजवळ आडम नावाचं गाव आहे. तिथं शेत नांगरत असताना काही रोमन नाणी मिळाली. त्यांचा अभ्यास केला तेव्हा त्या ठिकाणाचे पुरातत्वीय महत्त्व वाढले. खरंतर आडम इथं पुरातत्वीय साईट असल्याचं माहीत होतंच, पण तिची क्षमता किती मोठी आहे, हे या नाण्यांवरून लक्षात आले.

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like