पाऊस विशेषांक

दिवाळी २०१५ 



अंकाविषयी

पावसाच्या वेगवेगळ्या पैलूंवर व्यापक पद्धतीने प्रकाश टाकणारा हा अंक. या पैलूंची विभागणी त्यात विविध विभागांमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसात नेमके काय बदल झाले आहेत यांची वेगवेगळ्या भागातील लोकांनी केलेली मांडणी. पावसाचे हे बदल पुलाखालून किती पाणी वाहून गेलंय हे सांगून जातात. पावसामागचे विज्ञान त्याच्या निर्मितीचा पडण्याची - न पडण्याची रहस्यं उलगडते. पावसाच्या अनुषंघाने बदलणारे जनजीवन.. हे आपले जगणे त्याच्यावर किती अवलंबून आहे यावर प्रकाश टाकते. पावसाचा अंदाज तसेच, कृत्रिम पाऊस यावर टाकलेला दृष्टिक्षेप.. याद्वारे पावसाच्या अनुषंघाने विकसित झालेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची कल्पना येते.पावसाची स्थानिक भाकीते, तो पडावा यासाठी पाळल्या जाणाऱ्या प्रथा-पद्धती.. याद्वारे आपला संपूर्ण समाज पावसाशी किती एकरूप झाला आहे आणि आपली संस्कृती त्याच्यावर कशी अवलंबून होती -  आहे याची प्रचिती देतात.
साहित्य आणि पाऊस, पावसाळ्यातील खाद्यपदार्थ.. याद्वारे आपले संपूर्ण विश्वच पवसाने कसे व्यापून टाकले आहे याचा अंदाज देतात.
वेगवेगळ्या घटकांचा पाऊस.. यातून पाऊस फक्त रोमँटिकच नसतो, तर त्याचा विविध घटकांना कसा प्रभावित करतो- आनंद देतो, दाणादाण उडवतो, भीती बनून राहतो – याबाबत बरंच काही सांगतो.पावसाबाबतची वस्तुनिष्ट माहिती.. त्याबाबतचे आकलन येण्यासाठी उपयुक्त ठरते.
मुंबईत २६ जुलै २०१५ रोजी पडलेला पाऊस ही महाराष्ट्रातील (आणि देशातीलही!) पावसाची आजवरची सर्वांत मोठी आपत्ती. तिचे विविध पैलू उलगडताना एकूणच पाऊस आणि त्याच्या आपत्तींचे सर्वंकष चित्र उभे राहायला मदत होते.दर्जेदार मजकुरासोबतच समर्पक छायाचित्रे आणि आकर्षक मांडणी यांनी सजलेला भवतालचा हा पहिलाच अंक.


अनुक्रमणिका