पाणी संघर्ष विशेषांक

संघर्षाकडे 



अनुक्रमणिका


अंकाविषयी

या अंकाची मुख्य "थीम" आहे- पाण्याचा संघर्ष.

याबाबतीत आपला प्रवास संघर्षातून अधिक संघर्षाकडे सुरू आहे.आपले अतिशहरकेंद्री नियोजन, प्रादेशिक संघर्ष, कायदे नियमांमध्ये असलेला विरोधाभास याबाबतचे सविस्तर रीपोर्टआणि लेख यांचा यात समावेश आहे.

‘कोण म्हणते- तिसरे महायुद्ध पाण्यावरून होणार?’.. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप’चे श्री. संदीप वासलेकर यांची विशेष मुलाखत.

पाणी व सिंचनाच्या क्षेत्रात निर्माण झालेली अनागोंदी यावर जलअभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांचे भाष्य.

शेतकऱ्याने फाटक्या कपड्यात फिरावं हीच का तुमची अपेक्षा?.. असा सवाल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रातिनिधिक मांडणी. 

“पाण्यावरून संघर्षाच्या वातावरणात तालुकेनिहाय पाणीवाटपाचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग” सविस्तर उलगडून दाखवणारा लेख.

मुंबईसाठी ज्या भागातून पाणी येते, त्या भागात वेमकी काय स्थिती आहे यावर त्या भागात प्रत्यक्ष फिरून, लोकांशी बोलून टाकलेला प्रकाश.

आणि असं बरंच काही.