खडक विशेषांक

दिवाळी २०१६ 



अनुक्रमणिका


अंकाविषयी

महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने घडवणारी अनेक नैसर्गिक संसाधने आहेत. त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल तो इथल्या खडकाचा. म्हणजेच काळ्या पाषाणाचा अर्थात बेसॉल्टचा. हा खडक सर्व दृष्टीने अतिशय अनोखा आहे.

त्याची निर्मिती, त्याच्यामुळे आपल्या प्रदेशाची झालेली जडणघडण, त्याने इथल्या भूगोल-इतिहास-संस्कृती-अर्थकारणावर टाकलेला प्रभाव, इथले किल्ले – लेणी – इमारती यांच्या घडण्यामागे त्याचा सिंहाचा वाटा, त्याने या भूमीला दिलेली आगळीवेगळी ओळख, त्यात आढळणारी जगप्रसिद्ध खनिजे-स्फटिक.. अशा विविध मुद्द्यांच्या सविस्तर, रंजक, उद्बोधक माहितीने नटलेला हा विशेषांक.