परंपरागत जलव्यवस्था विशेषांक

दिवाळी २०१८ 



अनुक्रमणिका

 


अंकाविषयी

भारताच्या भूमीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या परंपरागत जलव्यवस्था. त्यांनीच आतापर्यंतच्या पिढ्यांना जगवले, विकसित होण्यास मदत केली. या जलव्यवस्थांची विचार करताना मुख्यत: गुजरात-राजस्थान आणि दक्षिण भारत यांचा उल्लेख केला जातो. मात्र, महाराष्ट्रही त्यात मागे नाही. आपल्या भूमीतही त्यांचा संपन्न वारसा अस्तित्वात आहे. भौगोलिक परिस्थिती आणि प्रदेशानुसार भिन्न हवामान यामुळे त्यात कमालीची विविधता पाहायला मिळते.

या जलव्यवस्थांचे त्या त्या भागानुसार अस्तित्व, त्यामागील तंत्र – वास्तुरचना – सौंदर्यमूल्य, त्यांची उपयुक्तता, सद्यस्थिती हे सारे समजून घेणे उद्बोधक ठरते आणि आवश्यकसुद्धा.

महाराष्ट्रातील साडेचार हजार वर्षापूर्वीच्या पहिल्या व्यवस्थेपासून आजपर्यंतच्या अनेक जलव्यवस्थांचा विस्तृत आढावा घेणारा आणि त्यांच्या निमित्ताने आपल्या भूमीचा आगळा पट उलगडून दाखवणारा हा विशेषांक.