भवताल ऑगस्ट २०२३ 



अंकाविषयी...

भवताल मासिक: ऑगस्ट २०२३ अंक

कामशिल्पे मंदिरांवर कशासाठी? (भाग ३)
* डॉ. अनुजा जोशी

महाराष्ट्रातल्या मंदिरांवरील कामशिल्पांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट मात्र निश्चितपणे म्हणता येईल, की कामशिल्पांचे अंकन हे त्या काळात लोकांना गरजेचे वाटत होते. मानव, प्राणी, भूमी यांच्या सर्जनशीलतेविषयीचा आग्रह, जननेंद्रियांतील, जननद्रव्यांतील यात्वात्मक शक्तींवरील श्रद्धा; तसेच तंत्रधर्माचा प्रभाव यांसारखे घटक हे मुख्यत्वे याच्या मुळाशी होते.
 

सर्पविष, सर्पदंश, प्रतिविष आणि बरेच काही...
* पीयूष सेकसेरिया

सर्पदंशाने व्यक्ती दगावण्याचा धोका सध्यस्थितीत बऱ्याच अंशी कमी झाला आहे. सर्पविषाचा प्रकार ओळखण्यासाठी जलद चाचण्या आणि अधिक प्रभावी प्रथमोपचारही विकसित झाले आहेत. एक देश म्हणून आपल्याला याबाबत अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी निभावणे गरजेचे आहे. सर्पदंशाविषयी समाजात जाणीवजागृती निर्माण करणे हे कदाचित या दृष्टीने पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे पाऊल ठरेल.

 

पोर्ट्रेट ऑफ अ टाईम...
* मैत्रेयी राजपूत

हस्तिदंताचा व्यापार, मानव- प्राणी संघर्ष, आकसत चाललेला अधिवास, आदी कारणांमुळे हत्तींची संख्या सतत कशी घटत चालली आहे, याची गोष्ट चित्रातून सांगण्याचा प्रयत्न...
 

याशिवाय,
भवताल बुलेटीन
इको अपडेट्स

अशा विषयांचा समावेश असलेला हा अंक.

अंक ऑर्डर करण्यासाठी लिंक :


अनुक्रमणिका