भवताल सप्टेंबर २०२३ 



अनुक्रमणिका


अंकाविषयी...

भवताल मासिक : सप्टेंबर २०२३ अंक

पाऊस पाहावा मोजून...
* टीम भवताल

सर्वसामान्य नागरिकांना निसर्ग-पर्यावरणाशी जोडण्याच्या उद्देशाने 'भवताल'तर्फे अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यापैकी सर्वांत व्यापक म्हणजे 'भिजूया-मोजूया' लोकांनी सामूहिकपणे पाऊस मोजण्याचा उपक्रम. 'भवताल : भिजूया-मोजूया' ही चळवळ कशी उभी राहते, याची गोष्ट....

एक बेडूक आपल्याला खूप काही शिकवू शकतो...
* पीयूष सेकसेरिया

झुडूपी बेडकांचा आढळ आपल्यासमोर काळाचा एक विशाल पट उभा करतो. हे कसं घडलं हे आपल्याला अजून माहीत नाही. उत्क्रांतीच्या अनेक न उलगडलेल्या रहस्यांपैकीच हे सुद्धा असंच एक रंजक रहस्य आहे. 

पोर्ट्रेट ऑफ अ टाईम...
* मैत्रेयी राजपूत

समुद्रातील 'घोडा मासा' ही प्रजाती अनोखी आहे. घोडा माशांमध्ये नर पिल्लांना जन्म देतात आणि त्यांची काळजी घेतात. या माशांबद्दलच्या पौराणिक कल्पना आणि त्यांचे औषधी गुणधर्म यामुळे त्याला कसे पकडले जाते आणि तो या प्रकियेचा कसा बळी ठरला आहे, याविषयी...

भवताल इकोटूर्स...
* पर्यटनाचा वेगळा अंदाज

नागरिकांना असं काहीतरी वेगळं देता आलं पाहिजे, जे इतर कोणी दिलं नसेल... शिवाय त्यातून काहीतरी शिकायला, अनुभवायला सुद्धा मिळायला हवं... असं काय असू शकेल? नक्की वाचा...

याशिवाय,
भवताल बुलेटीन
इको अपडेट्स

अशा विषयांचा समावेश असलेला हा अंक.