भवताल डिसेंबर २०२३ 



अंकाविषयी...

भवताल : डिसेंबर २०२३ अंक

मंझानारेस बये..
* महावीर जोंधळे

अंबाजोगाईच्या जलवंती नदीकाठचा एक लेखक स्पेनला जातो. तिथल्या माद्रिद शहरातून वाहणाऱ्या मंझानारेस नदीच्या काठी जातो. त्या नदीचे रूप पाहून त्याला राहवत नाही. तो तिच्याशी, नदीशी संवाद साधतो आणि आपल्या नदीबाबतच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करतो. त्या बहुदा आपल्या सर्वांसारख्याच असतात...

मेघालय डायरी
* अभिजित घोरपडे

'भवताल इकोर्स' या उपक्रमांतर्गत भवताल टीमकडून वेगवेगळे प्रदेश एक्सप्लोर केले जात आहेत. केवळ ठिकाणांना मेटी हा उद्देश न ठेवता तियला निसर्ग, वारसा, लोक यांना समजून घेता यावे, काहीतरी नवे उलगडता यावे या उद्देशाने हे केले जात आहे. अलीकडेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालय या राज्यात 'भवताल' ची टीम जाऊन आली. त्यात तिथल्या काही वेगळ्या गोष्टींचा शोध घेण्यात आला. त्याचीच मांडणी करणारी मालिका, 'मेघालय डायरी'...

मृत्यूशय्येवरील माळढोक
* पीयूष सेकसेरिया

महाराष्ट्रातील एकट्या अहमदनगर जिल्ह्यात १८०९ ते १८२९ दरम्यान रॉबर्ट मॅन्सफील्ड यांनी सुमारे ९६१ माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) पक्ष्यांची शिकार केली. चालू वर्षात (२०२३) संपूर्ण महाराष्ट्रात केवळ दोन माळढोक पक्ष्यांची नोंद झाली आहे. तसेच, देशातही या देखण्या पक्ष्यांची एकूण संख्या आता केवळ १०० ते १३० इतकीच उरली आहे. याविषयी...

याशिवाय,
इको अपडेट्स

अशा विषयांचा समावेश असलेला हा अंक.


अनुक्रमणिका