भवताल जानेवारी २०२४  



अंकाविषयी...

भवताल जानेवारी २०२४ 

सापांच्या सुटकेची गोष्ट!
* डॉ. हर्षद दिवेकर

सांगली येथे अलीकडेच एका सापाची सुटका करण्यात आली. तो तारेच्या जाळीमध्ये अडकलेला असल्याने हे काम गुंतागुंतीचे बनले. या निमित्ताने सापांचे बचावकार्य आणि त्या संदर्भात निर्माण होणारे अनेक मुद्दे यांच्यावर प्रकाश टाकणारा लेख.

देशातील पक्ष्यांची स्थिती काय?
* पीयूष सेकसेरिया

जाड चोचीचा फुलटोचा देशातील सर्वांत छोट्या पक्ष्यांपैकी एक. परागीभवनाच्या प्रक्रियेत हा पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतो. संवर्धनाची गरज असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या २० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी ही प्रजाती आहे. या शिवाय पक्ष्यांच्या नामशेष होत चाललेल्या इतर प्रजातींची स्थिती काय? याविषयी...

कच्छ, जीवाश्म आणि अनोखी इकोटूर
* अभिजीत घोरपडे

'भवताल'ने आयोजित केलेली 'कच्छ फॉसिल्स इकोटूर' हा पर्यटनाचा एक आगळा-वेगळा प्रयोग. सर्वसाधारण पर्यटन आणि ही इकोटूर यामध्ये मूलभूत फरक होता. आपल्या अवतीभवती दडलेली निसर्गरहस्ये उलगडणे आणि त्याची अनुभूती घेण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांना देणे, हा यामागचा उद्देश होता.प्रत्यक्ष फील्डवर फॉसिल्स शोधणे, त्यांच्याद्वारे जीवसृष्टीचा प्राचीन इतिहास समजून घेणे... याचबरोबर पहिल्यांदा फॉसिल्स शोधण्याचा, हाताळण्याचा रोमांच अनुभवणे हे खरेच कल्पनातीत असते. त्याचा अनुभव देण्याचा हा प्रयत्न होता...

याशिवाय,

इको अपडेट्स

अशा विषयांचा समावेश असलेला हा अंक.


 


अनुक्रमणिका