भवताल फेब्रुवारी २०२४  



अनुक्रमणिका


अंकाविषयी...

भवताल फेब्रुवारी २०२४ 

वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
* सुनील भोईटे

नावात बरेच काही आहे. नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याला नाव दिले गेले त्याची संपूर्ण ओळख आहे. म्हणून नाव महत्त्वाचे. ते पुसले गेले किंवा बदलले की जणू त्या गोष्टीची, त्याच्याशी संबंधित असलेल्या भवतालाची आणि समुदायाची ओळखच पुसली जाऊ शकते. पिढ्यान पिढ्या माहीत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींची मूळ नावे व त्यांचे स्थानिक संदर्भ उलगडून दाखवणारा हा उपक्रम ‘भवताल’ मंचावर राबवत आहोत. त्याविषयी...

अंजीर पट्ट्याला घरघर
* महेंद्र शिंदे 

अति उष्ण, अति थंड नसलेले आणि कोरडे हवामान अंजीर पिकाला पोषक आहे. ते पुण्याजवळील गोगलवाडी आणि वेळू या दोन गावांमध्ये असते. मात्र, अलीकडील पाच-सात वर्षांत बदलत्या हवामानाचा फटका येथील अंजीर पिकाला बसत आहे. बागांचे आयुर्मानही घटले आहे. या सर्व अडचणीमुळे अंजीर पिकाचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी सहज आणि सोपे राहिले नाही.

काचेच्या तावदानांना धडकण्यापासून पक्ष्यांना वाचवा
* पीयूष सकसेरिया

शहरी भागातील उंच काचेच्या इमारतीच केवळ पक्ष्यांच्या धडकांना कारणीभूत ठरत नाहीत, तर कमी प्रमाणातील शहरीकरणही या समस्येचे एक महत्त्वाचे कारण आहे. इमारतीच्या काचांना धडकून पक्षी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांत वाढ होत आहे. यावर साधे-सोपे उपाय असून, वास्तुविशारदांनी आणि सामान्य नागरिकांनी पक्ष्यांना अडथळ्याची जाणीव होईल, अशा पद्धतीच्या काचांचा वापर करण्याची गरज आहे.

याशिवाय,

इको अपडेट्स

अशा विषयांचा समावेश असलेला हा अंक.