भवताल मार्च २०२४ 



अनुक्रमणिका

 

 


अंकाविषयी...

भवताल मासिक : मार्च २०२४ अंक

लाव्हा टनेल
* अभिजित घोरपडे

महाराष्ट्रा हा दख्खनच्या पठाराचा भाग. ज्वालामुखीच्या उद्रेकांतून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हारस बाहेर पडला. तो थंड झाल्यामुळे इथल्या पठाराची निर्मिती झाली. या पठारावर इथल्या ज्वालामुखीच्या अनेक खाणाखुणा आढळतात. त्यापैकी एक म्हणजे अद्भूत आणि एकमेवाद्वितीय असा लाव्हा टनेल!

 

वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
* सुनील भोईटे

वनस्पतींच्या नावात बरेच काही आहे. या नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे, वनस्पतीची संपूर्ण ओळखच आहे. म्हणूनच नाव महत्त्वाचे. अलीकडे काही मंडळी वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडून वनस्पतींची ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. वनस्पतींच्या नावाची ही आगळीवेगळी, पण अतिशय महत्त्वाची गोष्ट! 'भवताल' मंचावरील हा नवा उपक्रम...
 

मेघालय-काझीरंगा (भवताल इकोटूर्स)
* इंदूमती जोंधळे

'भवताल इकोटूर्स'तर्फे फेब्रुवारी, मार्च महिन्यात मेघालय-काझीरंगा ही आगळीवेगळी टूर आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध भागांतून विविध वयोगटांतील नागरिकांचा या टूरमध्ये सहभाग होता. या गटाने एकत्र घेतलेले ज्ञान, केलेली धमाल आणि एक कुटूंब असल्यासारखे एकमेकांशी निर्माण केलेले बंध, याविषयी...  
 

याशिवाय,
भवताल बुलेटीन
इको अपडेट्स

अशा विषयांचा समावेश असलेला हा अंक.