जीवसृष्टी विशेषांक

दिवाळी २०१९  



अनुक्रमणिका


अंकाविषयी

महाराष्ट्राच्या मातातील जीवांचा पट उलगडून दाखवणारा हा विशेषांक.

 

प्रत्येक भूमीला आपला अधिवास असतो, तसा तो महाराष्ट्रालाही आहे. या अधिवासात ८० कोटी वर्षांपासून जीवांचे अस्तित्व असल्याचे पुरावे आहेत. तेव्हापासून आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात या भूमीचे तापमान-हवामान-भूरचना यात प्रचंड उलथापालथ झाली. त्यानुसार इथल्या जीवांमध्येही बदल होत गेले. असंख्य प्रजाती नामशेष झाल्या, तर तितक्याच जोमाने नव्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. त्यापैकी काहींनी कोट्यवधी वर्षे राज्य केले, तर क्षणभंगूर ठरल्या.

इथल्या मातीत नांदलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या अनेक जीवांचा विविधांगी आणि रोचक आढावा घेणारा हा विशेषांक.