सूक्ष्मजीव विशेषांक

दिवाळी २०२० 



अंकाविषयी

'कोविड १९' अर्थात 'कोरोना' च्या इवल्याशा विषाणूने संपूर्ण जग थांबवून ठेवलं, सर्व व्यवहार ठप्प केले. या सृष्टीतील एकूणच सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव. ते आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी त्यांच्याइतके महत्त्व दुसऱ्या कोणत्याही जीवांना असू शकणार नाही. कारण त्यांची प्रचंड असलेली संख्या, त्यांचे सृष्टीच्या कानाकोपऱ्यात असलेले अस्तित्त्व आणि सृष्टीच्या अस्तित्त्वासाठी आवश्यक असलेल्या सर्वच क्रियांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका.

सृष्टीबरोबरच त्यांचा माणसाशीही खूपच घट्ट संबंध आहे, कारण त्यांच्याविना माणसाचे पान हलणार नाही, पाऊलही पडणार नाही. म्हणूनच या सूक्ष्मजीवांची दुनिया समजून घेण्यासाठी ही सूक्ष्मजीव विशेषांक.


अनुक्रमणिका