Rainfall Observation For Date 14-06-2023
Participants Name : vaibhav
Title : भन्नाट रानवारा, मस्तीत शीळ घाली...
Description : भन्नाट रानवारा, मस्तीत शीळ घाली... गेले दोन तीन दिवस असच काहीसं वातावरण आहे आमच्याकडे साताऱ्यात. दिवसभर वाऱ्याचा जोर कायम राहतोय पण पाऊस काही पडत नाहीये. मधेच काळे ढग उभ्या उभ्या हजेरी लावतात पण वारा काही त्यांना एका ठिकाणी टिकू देत नाही. जोरदार वाऱ्यामुळे आमच्या घरासोबत इतरही काही घरांच्या बांधकामात बारीकसारीक अडथळे येत आहेत. वाऱ्याचच कारण देत विद्युत मंडळही त्यांचा कामचुकारपणा झाकू पाहतय. पक्षी वाऱ्यासोबत हेलकावे घेत प्रवास करत आहेत, झाडे आपल्या कमकुवत फांद्या झटकत आहेत आणि उन्हाने तापलेली जमीन धुळीचे सुस्कारे सोडत आहे. मान्सूनपूर्व मशागत पूर्ण करून शेतकऱ्याने पावसासाठी पायघड्या तर घातल्या आहेत, पण तो मात्र दुरूनच राम राम करून निघून जातोय. त्यामुळे अजून तरी वरूण राजांची वाट बघणे हेच आमच्या हातात आहे. तुमच्याकडे #पाऊसकायम्हणतोय? वैभव जगताप. ठोंबरेवाडी, नुने, सातारा मागील २४ तासात झालेला पाऊस 0 मीमी, 14 जून सकाळी ८:३० वाजता घेतलेली नोंद.